maths question bank std v

क्र .    प्रश्न
1    सर्वात लहान मूळ संख्या कोणती ?
2    सर्वात लहान संयुक्त  संख्या कोणती ?
3    2 व 3 या दोन्ही संख्यानी विभाज्य असणाऱ्या दोन संख्या लिहा .
4    दोन अंकी सर्वात मोठी मूळ संख्या कोणती ?
5    1 ते 100 पर्यंतच्या संख्यांमध्ये जुळ्या मूळ संख्यांच्या किती जोड्या आहेत ?
6    दोन अंकी जुळ्या मूळ संख्यांची एक जोडी लिहा.
7    इराटोस्थेनिसची चाळणी कोणत्या संख्या शोधण्याची पद्धती आहे ?
8    मूळ संख्या अनंत आहेत असे कोणत्या गणितज्ञाने सिद्ध केले ?
9    3 मी.लांबीच्या एका वायरचे 80 सेंमी लांबीचे 4 तुकडे हवे असल्यास किती लांबीचे वायर कमी पडेल ?
10    सम असणाऱ्या एकूण किती मूळ संख्या आहेत ?
11    1 हा एकच विभाजक सामाईक असणाऱ्या संख्यांना काय म्हणतात ?
12    1,3,11,33 हे कोणत्या संख्येचे विभाजक आहेत ?
13    1 ते 50 पर्यंतच्या संख्यांमध्ये किती  मूळ संख्या आहेत ?
14    51  ते 100 या दरम्यान  किती  मूळ संख्या आहेत ?
15    1  ते 100 या दरम्यान  किती  दोन अंकी संयुक्त संख्या आहेत ?
16    सर्वात लहान व सर्वात मोठी दोन अंकी संयुक्त संख्या कोणती ?
17    2 व 5 या दोन्ही संख्यानी विभाज्य असणाऱ्या दोन संख्या लिहा .
18    2 व 10 या दोन्ही संख्यानी विभाज्य असणाऱ्या दोन संख्या लिहा .
19    5 व 10 या दोन्ही संख्यानी विभाज्य असणाऱ्या दोन संख्या लिहा .
20    3 ने विभाज्य असणाऱ्या तीन अंकी दोन संख्या लिहा .
21    ₹ 107.50  म्हणजे किती रूपये व किती पैसे ?
22    2 शतांश रूपया दशांश रुपात कसे लिहाल ?
23    82.053 या संख्येत 5 ची स्थानिक किंमत किती ?
26    अकरा पूर्णांक सात शतांश ही संख्या दशांश रुपात कशी लिहाल ?
27    2 सेंमी =.......मीटर होय.(दशांश रुपात लिहा )
28    सव्वा दोन मीटर म्हणजे किती सेंटीमीटर ?
29    साडे अठरा ही संख्या दशांश अपूर्णांकात लिहा .
30    पावणे तीन रूपये व साडे नऊ रूपये यांची बेरीज करून दशांश अपूर्णांकात लिहा .
31    135 मिमी = ........सेंमी (दशांश रुपात लिहा )
32    सेंटी  व हेकटो या शब्दाचे  मराठी अर्थ काय आहेत  ?
33    वस्तुमान/वजन  मोजण्याचे मूळ एकक कोणते ?
34    लांबी / अंतर मोजण्याचे मूळ एकक कोणते ?
35    आकारमान /धारकता  मोजण्याचे मूळ एकक कोणते ?
36    दोन वर्षापूर्वी सोनियाची उंची 1.34 मी होती.आज 1.51 मी असल्यास तिची उंची किती सेंमी वाढली ?
37    41.24 - 13.7 = किती ?
38    1.23 + 21.12 +57.4 = किती ?
39    सव्वा चार व पावणे सात या संख्या दशांश अपूर्णांकात लिहा .
40    पाव व पाऊण यांचे लेखन व्यवहारी अपूर्णांकात कसे करतात ?
41    1:20 pm हे 24 ताशी कालमापन पद्धतीत कसे लिहाल ?
42    सकाळी 7 वाजून 3 मिनिटे 12 ताशी कालमापन पद्धतीत कसे लिहाल ?
43    सकाळी 7 वाजून 3 मिनिटे 24 ताशी कालमापन पद्धतीत कसे लिहाल ?
44    दिवस बदलतो तेव्हा डिजिटल घड्याळ वेळ कशी दर्शवते ?
45    साडे पाच तास =......... मिनिटे .
46    नम्रता 10am ते 6pm पर्यंत ऑफिसमध्ये होती म्हणजे ती ऑफिसमध्ये  किती तास होती ?
47    3 तास 20 मिनिटे - 2 तास 30 मिनिटे = किती ?
48    बँकेचे कामकाज सकाळी 9:30 पासून दुपारी 3:00 पर्यंत चालते ,तर बँकेचे कामकाज किती वेळ चालते
49    7 तास 50 मिनिटे + 2 तास 20 मिनिटे = किती ?
50    मध्यान्होत्तर 2 वाजून 13 मिनिटे ही वेळ 24 ताशी घड्याळात कशी दाखवली जाईल ?
51    पाव लीटर दुधाला 12 रूपये लागतात तर 9 लीटर दुधाला किती रक्कम लागेल ?
52    14रू.70 पैसे दराने 1 किग्रॅ साखर खरेदी केल्यास 20 रुपयातील किती शिल्लक राहतील ?
53    8 मीटर 25 सेंमी लांबीच्या वायरचे 3 सेंमी चा एक याप्रमाणे तुकडे केले ,तर किती तुकडे होतील ?
54    रात्री 9 वाजून 42 मिनिटांनी सुरु झालेला चित्रपट अडीच तासांनी संपला तर चित्रपट किती वाजता संपला ?
55    ताशी 50 किमी वेगाने धावणारी बस साडेतीन तासात किती अंतर पार करेल ?
56    110 रूपये प्रति मीटर दराने साडेचौदा मीटर कापड खरेदीसाठी किती रूपये द्यावे लागतील ?
57    धान्यकोठीत 50 किग्रॅ तांदूळ मावतात .जर 17 किग्रॅ 620 ग्रॅम तांदूळ वापरल्यास कोठीत किती तांदूळ शिल्लक राहिले ?
58    एका ड्रेससाठी 3 मी 30 सेंमी कापड लागते तर अशा 7 ड्रेससाठी किती कापड लागेल ?
59    15 ग्रॅम लवंगाची एक पिशवी याप्रमाणे 2 किग्रॅ 250 ग्रॅम वजनाच्या लवंगांच्या किती पिशव्या तयार होतील ?
60    राजेश ताशी 4 किमी वेगाने चालतो तर 3 किमी एवढे चालण्यासाठी त्याला किती वेळ लागेल ?
61    18 सेंमी बाजूची लांबी असणाऱ्या चौरसाकृती रुमालाची परिमिती किती ?
62    आयताकार मैदानाची लांबी 80मी व रुंदी 60मी असल्यास मैदानाभोवती 4 फेऱ्या मारल्यास किती अंतर होईल ?
63    11.2 सेंमी ,13.4 सेंमी व 11.2 सेंमी बाजूची लांबी असणाऱ्या त्रिकोणाची परिमिती किती ?
64    60 मी लांब व 40 मी रुंद असणाऱ्या शेताला तीन पदरी कुंपण घालण्यासाठी एकूण किती लांबीची तार लागेल ?
65    40 मी बाजू असलेल्या चौरसाकृती जागेला 60 रू प्रतिमीटर दराने चौपदरी कुंपणासाठी किती खर्च येईल ?
66    6 मी लांब व 4 मी रुंद असणाऱ्या भिंतीचे क्षेत्रफळ किती ?
67    दर चौरस मीटरला 90 रूपये दराने 20 मी लांब व 15 मी रुंद नाट्यगृहाला फरशी बसवण्याची मजुरी किती ?
68    एका चौरसाची बाजू 5 मिमी आहे तर त्याचे क्षेत्रफळ व परिमिती किती ?
69    एक चौ.मी. भूखंडाची किंमत 1200 रूपये असल्यास 50मी लांब  व 40मी रुंद भूखंडाची किंमत किती होईल ?
70    25 सेंमी बाजू असणाऱ्या चौरसाचे क्षेत्रफ़ळ किती ?
71    त्रिमितीय दोन वस्तूंची नावे लिहा.
72    द्विमितीय दोन वस्तूंची नावे लिहा.
73    पाच चौरसांच्या जोडणीला काय म्हणतात ?
74    ज्या त्रिमितीय आकारात सर्व पृष्ठे आयताकार असतात त्या आकारास काय म्हणतात ?
75    ज्या त्रिमितीय आकारात सर्व पृष्ठे चौरसाकार असतात त्या आकारास काय म्हणतात ?
76    इष्टिका म्हणजे काय ?
77    विटेला किती पृष्ठे असतात ?
78    जर एक चित्र =12 पुस्तके  तर अशा 7 चित्रांचा अर्थ किती पुस्तके असा होईल ?
79    60 विद्यार्थ्यांसाठी 6 चित्रे तर 8 चित्रे किती विद्यार्थी संख्या दर्शवते ?
81    कोणत्याही तीन क्रमागत चौरस संख्या लिहा.
82    कोणत्याही तीन क्रमागत त्रिकोणी संख्या लिहा.
83    अशी एक संख्या लिहा,कि जी त्रिकोणी आहे आणि चौरस संख्याही आहे .
84    पहिली त्रिकोणी संख्या 3 मानली ,तर क्रमाने येणारी पाचवी त्रिकोणी संख्या कोणती ?
85    पहिली चौरस संख्या 9  मानली ,तर क्रमाने येणारी आठवी चौरस  संख्या कोणती ?
86    बुद्धिबळाच्या पटावरील चौरसांची संख्या ही त्रिकोणी संख्या आहे कि चौरस संख्या आहे ?
87    एकूण चौरस संख्या किती आहेत ?
88    एकूण त्रिकोणी संख्या किती असतील ?
89    गटात न बसणारी संख्या शोधा. 9 , 25 , 49 , 80 , 100
90    मालिका पूर्ण करा. 1 ,4 ,9, 16 ,----,---
91    मालिका पूर्ण करा. 6 ,10 ,15 ,----, --- ,36,45,55
92    अक्षर वापरून गुणधर्म लिहा. कोणत्याही संख्येस 1 ने गुणल्यास तीच संख्या येते .
93    अक्षर वापरून गुणधर्म लिहा. कोणतीही संख्या आणि 0 यांचा गुणाकार शून्य असतो .
94    रिकाम्या योग्य संख्या लिहा. (12 +8 ) = ( 5 x .....)
95    रिकाम्या योग्य संख्या लिहा. 64 ÷ 4 = (... + ...)
98    समानता दर्शवण्यासाठी कोणते चिन्ह वापरतात ?
99    असमानता दर्शवण्यासाठी कोणती  चिन्हे वापरतात ?
100    लांबी साठी l व रुंदीसाठी b हे अक्षर वापरून आयताचे क्षेत्रफ़ळ हे सूत्र कसे लिहाल ?

MDM Mobile APP मध्ये पोषण आहाराची दररोजची माहिती भरण्यासाठी सध्या वापरात असणाऱ्या जुन्या व्हर्जनवरुन माहिती भरता येणार नाही. नवीन MDM Mobile APP Version MDM वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. तरी, सर्व युर्जसने सध्याचे जुने MDM Mobile APP Uninstall करावे. व नवीन MDM Mobile APP वेबसाईटवरुन download करुन Mobile मध्ये Install करावे........ .



---------------------------------------------------------
CLICK TO DOWNLOAD