सहावी गणित

क्र.    प्रश्न तपशील
1    ऋण तेरा ही संख्या अंकात कशी लिहितात?
2    4 , -17  व   0   पैकी सर्वात लहान संख्या कोणती ?
3    (-7) व (+13) यांची बेरीज ------- येते.
4    (+73) ही संख्या अक्षरात कशी लिहितात?
5    (-7) ही संख्या   संख्यारेषेवर शून्याच्या कोणत्या बाजूस येते ?
6    (+34) व (-34)  यादोन्ही संख्यांची चिन्हविरहित किंमत किती ?
7    कोणत्या पूर्णांक  संख्येला धन किंवा ऋण चिन्ह  नसते.
8    (-18) मधून 15 वजा केल्यास ------ येते.
9    कोणतीही संख्या व तिची विरुद्ध संख्या यांची बेरीज किती असते ?
10    (+14) व (-5) यांचा गुणाकार किती येतो  ?
11    (-200) ÷ (-25) = किती ?
12    117 या संख्येला (-13) ने भागल्यास भागाकार किती ?
13    18 ÷(-3) x 11=किती ?
14    (-19) , (-27) व ( +4) या संख्या उतरत्या क्रमाने लिहा.
15    k हे चल वापरून कोणत्याही दोन एकपदी बैजिक राशी लिहा.
16    गटात न बसणारी बैजिक राशी लिहा. 12xy, 7-n, 24pqr
17    वजाबाकी करा.(15abc+13bc) - 7bc
18    बेरीज करा. (mn) + (-11mn) + (8mn)
19    गुणाकार करा.(-12) × 1000
20    गुणाकार करा.(751) × (-5) × 0
21    बेरीज करा. (7ab +9cd) + (3cd +4ab)
22    जर x = 3  व y = 4    तर   2x +3y =किती ?
23    जर 4x = 12 + x तर  x = किती ?
24    8 n = 72 या समीकरणाची उकल काढण्यासाठी कोणता समानतेचा गुणधर्म वापरावा लागेल ?
25    0.87 हे दशांश अपूर्णांक रूप % चिन्ह वापरून कसे लिहाल ?
26    60 चा शेकडा वीस किती येईल ?
27    पाव चा पाव % =किती ?
28    56 ही संख्या 70 च्या शेकडा किती आहे ?
29    500 रु.मुद्दलावर द.सा.द.शे.3 दराने 2 वर्षाचे एकूण किती रुपये परत करावे लागतील ?
30    7 सेमी लांबी व 8 सेमी रूंदी असलेल्या आयताचे क्षेत्रफळ किती?
31    12 छेद 20 हा अपूर्णांक % चिन्ह वापरून कसे लिहाल ?
32    0.030 चे शेकड्यात रुपांतर करा.
33    त्रिकोणाच्या प्रत्येक कोनाचे माप 60 अंश असल्यास......... त्रिकोण तयार होईल.
34    काटकोन त्रिकोणात सर्वात मोठ्या कोनाचे माप ------ अंश असते.
35    कोणत्याही त्रिकोणाला एकूण किती बाह्यकोन असतात ?
36    त्रिकोणाच्या दोन बाजू समान लांबीच्या आहेत तर तो..........त्रिकोण असेल.
37    त्रिकोणाच्या दोन कोनांची मापे अनुक्रमे 35 अंश  व 75 अंश आहेत तर उर्वरित कोनाचे माप किती
38    रेषेला त्याच रेषेवरील बिंदूतून लंबरेषा काढताना कोणकोणत्या पद्धतीचा वापर करतात ?
39    कोणत्याही रेषाखंडाचा दुभाजक त्या रेषाखंडाला लंब असल्यास त्याला.......म्हणतात.
40    x-अक्ष  व y -अक्ष यांच्या छेदनबिंदूला ----------असे म्हणतात ?
41    आयताकार बागेची लांबी 14 मी . व रुंदी 10 मी  असल्यास बागेचे क्षेत्रफ़ळ किती ?
42    5 मी.लांब व 3मी.उंच भिंतीला दर चौ.मीटरला 20 रुपयाप्रमाणे किती खर्च येईल ?
43    30 सेमी लांबीच्या चौरसाकृती रुमालाचे दोन समान तुकडे केल्यास प्रत्येक तुकड्याचे क्षेत्रफळ किती?
44    0.8 मी.लांब व  0.2 मी.रुंद लाकडी फळीचे  क्षेत्रफळ किती चौ.सेमी.येईल ?
45    इष्टिकाचीती आकाराच्या दोन वस्तूंची नावे लिहा.
46    6 सेमी बाजू असलेल्या घनाकृती ठोकळ्याचे घनफळ किती ?
47    साबणाचे घनफळ 180 घ.सेमी असून त्याची लांबी 10 सेमी व उंची 3 सेमी असल्यास रुंदी काढा.
48    1 घनमीटर म्हणजे किती घनसेंटीमीटर ?
49    एका वर्तुळाला किती जीवा काढता येतील ?
50    7 सेमी व्यास असलेल्या वर्तुळाची त्रिज्या किती ?
51    व्यास ही वर्तुळाची सर्वात लांब असणारी...........होय.
52    वर्तुळ कंसाला नाव देण्यासाठी किती अक्षरे वापरतात?
53    5 मी.लांब व 3मी.खोल व 4मी.रुंद खड्डा खणल्यास खड्ड्यातून किती माती बाहेर पडेल?
54    3/20 या  अपूर्णांकाचे शेकडेवारीत रुपांतर करा .
55    अमितला 300 पैकी 243 गुण मिळाले तर त्याला शेकडा किती गुण मिळाले ?
56    18/60 या अपूर्णांकाचे शेकडेवारीत रुपांतर करा .
57    सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती ?
58    सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती ?
59    सर्वात लहान पूर्णांक संख्या कोणती ?
60    ज्या दोन संख्यांची बेरीज शून्य येते त्यांना परस्परांच्या ............ संख्या म्हणतात .
61    67 % दशांश अपूर्णांकात कसे लिहाल ?
62    त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज .....येते .
63    घन आकाराच्या दोन वस्तूंची नावे लिहा.
64    8.5 सेंमी त्रिज्या असणाऱ्या वर्तुळाची सर्वात लांब जीवेची लांबी किती असेल ?
65    वर्तुळाला किती जास्तीत जास्त जीवा काढता येतील ?
66    ज्या इष्टिकाचीती ची लांबी ,रुंदी व उंची समान असते तेव्हा तिला काय म्हणतात ?
67    घनफळ मोजण्याची प्रमाणित एकके कोणती ?
68    3 मी.लांब ,2 मी रुंद व 1 मी उंच असणाऱ्या पाण्याच्या टाकीत किती पाणी मावेल ?
69    घरात फरशी बसविताना पृष्ठभागाची परिमिती कि क्षेत्रफळ विचारात घ्यावे लागते ?
70    जर आलेखात y अक्षावर 1 सेंमी = 10 गुण असतील तर 7.8 सेंमी किती गुण दर्शवेल ?
71    12 ही संख्या 75 च्या शेकडा किती आहे ?
72    n -12 = 34 असेल तर n ची किंमत  किती ?
73    17 b = 34 या समीकरणाची उकल किती ?
74    7 + y = 12 हे समीकरण सोडविताना समानतेचा कोणता गुणधर्म वापरावा लागतो ?
75    m व n हे चल वापरून कोणतीही एक  द्विपदी तयार करा .
76    9pq या बैजिक राशीत सहगुणक कोणता ?
77    जर a = 3 व b= 4 असेल तर 2a - b ची किंमत काढा .
78    30 सेंमी लांब व 20 सेंमी रुंद असणाऱ्या आयताचे क्षेत्रफळ लिहा .
79    जयला91 % गुण  म्हणजेच 455 गुण मिळाल्यास ,परीक्षा एकूण किती गुणांची होती ?
80    साडे चारशे चा शेकडा 12 किती ?

MDM Mobile APP मध्ये पोषण आहाराची दररोजची माहिती भरण्यासाठी सध्या वापरात असणाऱ्या जुन्या व्हर्जनवरुन माहिती भरता येणार नाही. नवीन MDM Mobile APP Version MDM वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. तरी, सर्व युर्जसने सध्याचे जुने MDM Mobile APP Uninstall करावे. व नवीन MDM Mobile APP वेबसाईटवरुन download करुन Mobile मध्ये Install करावे........ .



---------------------------------------------------------
CLICK TO DOWNLOAD